मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून वैद्यकीय यंत्रणेवर ताण येतो आहे. तसेच रुग्णांना खाटांची कमतरता भासू नयेत, म्हणून गेल्यावर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आयसोलेशल कोचची (डबे) निमिर्ती केली होती. मात्र, गेल्यावर्षी या आयसोलेशल कोचचा वापर झालेला नव्हता. मात्र, यंदा परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वेच्या आयसोलेशल कोच वापर होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात 128 आयसोलेशन कक्ष आहेत. तर, मध्य रेल्वेकडे 48 आयसोलेशन कोच असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
महाराष्ट्रात आयसोलेशन कोचचा वापर नाही
कोरोना विषाणूच्या मुकाबला करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांकरिता भारतीय रेल्वेने मेल-एक्सप्रेसच्या पाच हजार प्रवासी डब्याचे आयसोलेशन कोचेसमध्ये रूपांतर केले होते. रेल्वेच्या आयसोलेशन कोचच्या वापर अनेक राज्यांनीही केला होता. मात्र, महाराष्ट्रात या डब्याचा वापर करण्यात आलेला नव्हता. या पाच हजार आयसोलेशन कोचपैकी संपूर्ण मध्य रेल्वेवर 482 आणि पश्चिम रेल्वेवर 410 आयसोलेशन कोच तयार करण्यात आले. मात्र, यावेळी राज्य सरकारकडून आयसोलेशन कक्षाची मागणी न केल्याने कोच पडून होते. दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाला श्रमिक विशेष रेल्वे, इतर मेल, एक्स्प्रेससाठी कोच कमी पडू लागले. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या सुचनेनुसार श्रमिक विशेष रेल्वे वाढविण्यासाठी आयसोलेशन कक्षाचे रुपांतर पुन्हा नियमित प्रवासी डब्यात केले.
मागणी केल्यास आयसोलेशन कोच देऊ