महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हायटेक एसी लोकलच्या सर्वेक्षणाचा नावावर मुंबईकरांची दिशाभूल' - ई-सर्वेक्षण फॉर्म मोहिम

एसी लोकलचे भरमसाट तिकिट मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने इतर गाड्यांना प्रवाशांची गर्दी प्रमाण वाढले होते. त्यामुळे आम्ही रेल्वेला एसी लोकलचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल यासह अनेक सूचना मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र आतापर्यत या सूचनेची दखल घेत नाही. आता दुसऱ्यांदा एसी लोकल बाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे

Railways mislead Mumbaikars on AC local Survey
हायटेक एसी लोकलच्या सर्वेक्षणाचा नावावर मुंबईकरांची दिशाभूल

By

Published : Jun 16, 2021, 9:41 AM IST

मुंबई - गेल्या वर्षी मध्य रेल्वेवर पहिली एसी लोकल ट्रान्सहार्बर मार्गावर आणि दुसरी मुख्य मार्गवर धावायला सुरुवात झाली होती. मात्र, या दोन्ही लोकलला अत्यंत कमी प्रतिसाद असल्याने प्रवासी वाढवण्यासाठी थेट जनसामान्यांपर्यंत पोहचण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा सुरू केल्या आहे. आता मध्य रेल्वेने एसी लोकल संबंधित ई-सर्वेक्षण फॉर्म मोहिम सुरु केली आहे. मात्र, प्रवासी संघटनेकडून सतत सूचना देऊन सुद्धा यांची दखल रेल्वेकडून घेतली जात नाही. फक्त सर्वेक्षणाचा नावावर मुंबईकरांची दिशाभूल करण्याचे काम रेल्वेकडून केले जात असल्याचा घणाघाती आरोप रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केला आहे.

हायटेक एसी लोकलच्या सर्वेक्षणाचा नावावर मुंबईकरांची दिशाभूल

एसी लोकलला प्रतिसाद नाही -

पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेने आपल्या मार्गांवर एसी लोकल चालविण्याची सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यात आली आहे. मध्य रेल्वेने लोकल सेवेतील काही फेऱ्या बाद करून त्याऐवजी एसी लोकल ट्रेनच्या चालविण्यात येत आहे. मात्र, एसी लोकलचे भरमसाट तिकिट मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने ईतर गाड्यांना प्रवाशांची गर्दी प्रमाण वाढले होते. त्यामुळे आम्ही रेल्वेला एसी लोकलचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल यासह अनेक सूचना मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र आतापर्यत या सूचनेची दखल घेत नाही. आता दुसऱ्यांदा एसी लोकलबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

एसी लोकलचे सर्वेक्षण-

सर्वप्रथम मध रेल्वेवर पहिली एसी लोकल सुरु झाली. तेव्हा प्रवाशांच्या या एसी लोकल अत्यंत्य अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार ऑफ लाईन आणि ऑनलाईन सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले होते. प्रवाशांच्या अडचणी मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर प्रतिनिधींची नेमणूक सुद्धा करण्यात आली होती. तरीही प्रवाशांची संख्या वाढली नाही. नंतर कोरोनामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. आता मध्य रेल्वेवर एका वर्षानंतर दुसऱ्यांदा लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्वेक्षण सुरु केले आहे, २० प्रश्नांचा समावेश असलेल्या या सर्वेमध्ये 'होय' किंवा 'नाही' आणि कोणत्या मार्गाने प्रवास करता अशा अनेक स्वरूपात माहिती प्रवाशांना भरायची आहे.

मुंबईकरांची दिशाभूल थांबावा -

रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनीईटीव्ही भारताला सांगितले की, मध्य रेल्वेच्या ताफ्यात गेल्या वर्षी एसी लोकल दाखल झाली होती. तेव्हा मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात सर्व प्रवासी संघटनेची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सर्व प्रवासी संघटनानी एकमताने रेल्वेला निवेदन देऊन वातानुकिल लोकलचे स्वागत केले होते. तसेच एसी लोकलसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून नका, 12 डब्याच्या सामान्य लोकलला 3 डबे एसी लोकलचे जोडण्याची विनंती केली होती. तसेच एसी लोकलचे भाडे सर्वसामान्य परवडेल असले ठेवण्याची सूचना आम्ही केल्या होत्या. त्यानंतरही रेल्वेने एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. सर्वेक्षणानंतर रेल्वेकडून काहीच बदल केलेला नाही. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा एसी लोकल संबंधित ई-सर्वेक्षण फॉर्म मोहीम सुरु केली आहे. मात्र,प्रवासी संघटनेकडून सतत सूचना देऊन सुद्धा यांची दखल रेल्वेकडून घेतली जात नाही. फक्त सर्वेक्षणाचा नावावर मुंबईकरांची दिशाभूल करण्याचे काम रेल्वेकडून केले जात असल्याचा घणाघाती आरोप सुभाष गुप्ता यांनी केला आहे.

हेही वाचा - मुंबईत मध्य रेल्वेचीही आजपासून वातानुकुलीत सेवा! पहाटे धावली पहिली एसी लोकल..

ABOUT THE AUTHOR

...view details