मुंबई:सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई आणि सोलापूर, सोलापूर आणि नागपूर तसेच सोलापूर आणि तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (railway weekly special train schedule for mumbai solapur nagpur tirupati)
मुंबई - सोलापूर साप्ताहिक विशेष (पनवेल, लातूर, बिदर मार्गे जाणार) गाडी क्रमांक 01436 विशेष १४ डिसेंबर २०२२ ते १५.फेब्रुवारी २०२३ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवारी १२.५० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01435 विशेष गाडी दि. १३ डिसेंबर २०२२ ते १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सोलापूर येथून दर मंगळवारी ०९.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
थांबेठाणे, पनवेल, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, बिदर, ताज सुलतानपूर, कलबुरगि जंक्शन, गाणगापूर रोड आणि अक्कलकोट रोड. (railway weekly special train schedule for mumbai solapur nagpur tirupati)
सोलापूर - नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेषगाडी क्रमांक 01433 विशेष गाडी दि. ११ डिसेंबर २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत दर रविवारी २०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.०५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01434 विशेष गाडी दि. १२ डिसेंबर २०२२ ते १३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत दर सोमवारी १५.१५ वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.४० वाजता सोलापूर येथे पोहोचेल.