मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळामध्ये राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा सोशल माध्यमांवर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर या गुन्हेगार, समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून राज्यभर कारवाई करीत आहेत.
वांद्रे जमावप्रकरणी अफवा पसरविणारी 30 सोशल खाती आली समोर - bandra case
14 एप्रिलला बांद्रा बस डेपो येथे जमलेल्या जमावप्रकरणी 30 सोशल खात्यांवरून रेल्वे सुरू होत असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. ज्यात एका वृत्तवाहिनीचा समावेश असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 291 गुन्हे 14 एप्रिलपर्यंत दाखल करण्यात आले आहेत.
14 एप्रिलला बांद्रा बस डेपो येथे जमलेल्या जमावाप्रकरणी 30 सोशल खात्यांवरून रेल्वे सुरू होत असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. ज्यात एका वृत्तवाहिनीचा समावेश असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 291 गुन्हे 14 एप्रिलपर्यंत दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे बीड जिल्ह्यात 26 नोंदविण्यात आले असून, कोल्हापूर 15, पुणे ग्रामीण 11, मुंबई 10, सांगली 10, जळगाव 13, जालना 9, सातारा 7, नांदेड 7, परभणी 7, नाशिक शहर 6, नागपूर शहर 5, ठाणे शहर 5, सिंधुदुर्ग 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, गोंदिया 4, सोलापूर ग्रामीण 5, सोलापूर शहर 3, नवी मुंबई 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1, लातूर 4 , धुळे 1 असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
व्हॉट्सअॅपवर विवादास्पद मेसेज पाठविल्याप्रकरणी 99 गुन्हे दाखल असून फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याप्रकरणी 66 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. टिकटॉकवर व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल असून ऑडिओ क्लिप व यूट्युबचा गैरवापर करण्याप्रकरणी 37 गुन्हे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी नोंदविण्यात आले आहेत. 35 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून 114 आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे.