महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोर्डी स्थानकाजवळ झुकले पुलाचे गर्डर, पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेच्या बोर्डी स्थानकाजवळ ओव्हर ब्रिजचा गर्डर झुकल्याने रेल्वे सेवा ठप्प करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे हे गर्डर झुकले आहे.

बोर्डी स्थानकाजवळ रेल्वे सेवा ठप्प

By

Published : Jun 12, 2019, 5:30 PM IST

Updated : Jun 12, 2019, 8:19 PM IST

पालघर- महाराष्ट्र गुजरात सीमेलगत पश्चिम रेल्वेच्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकानजीक रेल्वे पुलाचे काम सुरू असताना, पालघरमधील बोर्डी स्थानकाजवळ वाऱ्यामुळे गर्डर झुकल्याने पालघर मार्गावरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

चक्रीवादळामुळे ओव्हर ब्रिजचा गर्डर झुकला

'वायू' चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने सरकत असून पालघर जिल्हा महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेलगत आहे. या चक्रीवदळाचा परिणाम पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीभागात जाणवू लागला आहे. किनारपट्टी भागात समुद्र खवळल्याचे दिसून येत आहे. वारे जोराने वाहू लागले आहेत, तसेच काही भागात पाऊसही सुरू आहे. या चक्रीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वाहत असलेल्या जोरच्या वाऱ्यामुळे बोर्डी रेल्वे स्थानकाजवळ गर्डर झुकले. यामुळे पश्चिम रेल्वेची पालघर मार्गावरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्याची रेल्वे सेवा जवळपास तासभर ठप्प होती.

गर्डर झुकल्यामुळे घटनास्थळी काम करणारे 4 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून दुरुस्तीकाम प्रगतीपथावर सुरु आहे. सध्या लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली असून लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत.

Last Updated : Jun 12, 2019, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details