मुंबई - रेल्वे मंत्रालयाकडून गाड्या उपलब्ध होत नसल्याच्या वक्तव्यानंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी तत्काळ 145 ट्रेन महाराष्ट्रातून सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गेले दोन दिवस सुरू असलेले राजकारण आजतागायत थांबत नसल्याचे दिसतेय. आज गोयल यांनी रेल्वे सोडण्यासाठी प्रवासीच उपलब्ध नसल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
गाड्या सोडण्यासाठी प्रवासी नियोजन नाही, गोयल यांचा सरकारवर पुन्हा निशाणा - केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल लेटेस्ट न्युज
महाराष्ट्र सरकारने केलेल्या विनंतीवरून आम्ही आज 145 ट्रेन सकाळपासून सज्ज ठेवल्या. त्यातील आज 50 गाड्या दुपारी 3 वाजेपर्यंत सोडण्यात येणार होत्या. मात्र, प्रवासी कमी संख्येअभावी फक्त 13 ट्रेन सोडण्यात आल्याची माहिती गोयल यांनी ट्विटरवरून दिली.
महाराष्ट्र सरकारने केलेल्या विनंतीवरून आम्ही आज 145 ट्रेन सकाळपासून सज्ज ठेवल्या. त्यातील आज 50 गाड्या दुपारी 3 वाजेपर्यंत सोडण्यात येणार होत्या. मात्र, प्रवासी कमी संख्येअभावी फक्त 13 ट्रेन सोडण्यात आल्याची माहिती गोयल यांनी ट्विटरवरून दिली. त्रस्त मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना वेळेत स्थानकात घेऊन यावे आणि सहकार्य करावे, अशी विनंती गोयल यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. यामुळे संपूर्ण नियोजनावर परिणाम होईल, असे गोयल यांनी म्हटले.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, की आम्ही महाराष्ट्रात समाधानकारक गाड्या तयार ठेवल्यात. मात्र, राज्य शासनाकडून प्रवासी यादी कमी येत आहे. आज सीएसएमटीवरून पहिली ट्रेन दुपारी 12.30 वाजता सोडण्यात आली. राज्य शासनाने प्रवाशांना वेळेत स्थानकात आणावे, जेणेकरून गाड्या वेळेत सोडता येतील, असेही ते म्हणाले.