मुंबई - सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता आणि रेल्वे परिसरावरील प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी, पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागातील काही गर्दीच्या आणि महत्वाच्या स्थानकांवर ३१ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर १० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला (Railway increase platform ticket) आहे. पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सुरत या रेल्वेस्थानकांचा समावेश (Mumbai Central Dadar Borivali Bandra Terminus) आहे.
गर्दीमुळे तिकीट वाढ :जर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर रेल्वे स्टेशनवर जात असाल, तर तुमचा खिसा थोडा मोकळा होणार आहे. वास्तविक, आता रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर १० रुपयांवरून ५० रुपयांवर गेला (increase platform ticket) आहे. तिकाटाच्या किमतीत पाचपट वाढ करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वेस्थानकांवर लोकांची होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.