मुंबई -ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला व स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षांच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी प्रवेशपत्र दाखवावे लागणार आहे. स्टेशनवरचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांना विद्यार्थ्यांना प्रवासासाठी परवानगी देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.