मुंबई Railway Engine Fail in Kasara:धुळे येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणारी विशेष एक्सप्रेस ही आज वाशिंद आणि कसारा याच्या दरम्यान अचानक बंद पडली. याचे कारण या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती तिथून पुढे जाईना किंवा जागची हलेना. त्यामुळे ती गाडी थांबल्याचा परिणाम इतर मेल एक्सप्रेस आणि सर्व लोकल सेवावर पडला. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. (local train traffic stopped)
धुळे ते मुंबई एक्सप्रेस ट्रेनचे इंजिन फेल :ट्रेन क्रमांक 1102 धुळे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ही विशेष एक्सप्रेस ट्रेन आहे; परंतु इथे इंजिन अचानक वाशिम कसारा दरम्यान फेल झालं. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणारी वाहतूक त्याच्यावर परिणाम झाला. तब्बल 12:05 पासून तर 01:50 पर्यंत इंजिन फेलच झालेलं होतं; परंतु त्यानंतर मध्य रेल्वेचे इंजिनियर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी इंजिन चालू केलं. त्यामुळे आता सेवा सुरळीत झालेली आहे.
रेल्वे प्रशासनाची भूमिका :या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, अचानक तांत्रिक कारणामुळे आज धुळ्यापासून ते मुंबईकडे येणारी एक्सप्रेस ट्रेनचे इंजिन फेल झाले होते. त्याचा परिणाम असा झाला, की लोकल सेवा देखील विस्कळीत झाल्या. दोन तास तब्बल 12 वाजून पाच मिनिटांपासून ते 01:45 पर्यंत एक्सप्रेस ट्रेन तिथेच थांबली. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल सेवांवर त्याचा परिणाम झाला. परिणामी, कल्याण-ठाणे आणि त्याच्यापुढे लोकल उशिराने धावू लागल्या; परंतु 1 वाजून 45 मिनिटांपासून याबाबतचं काम पूर्ण झालेलं असून आता लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन पूर्ववत धावू लागलेल्या आहेत, असं त्यांनी म्हटलं.
रेल्वे प्रवासी संघटना काय म्हणतात -मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते अमोल पाटील म्हणाले, दोन तास एक्सप्रेसचे इंजिन फेल झाले. त्याच्यामुळे एक्सप्रेस तिथेच थांबली; परंतु याची माहिती उद्घोषणा कक्षामधून नेमकी दिली गेली नाही. त्यामुळे लोकल सेवांवर परिणाम झाला आणि इतर ट्रेनसुद्धा रखडल्या. कामाला जाणाऱ्या येणाऱ्यांना याचा फटका बसला. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा:
- शेतकऱ्यानं थेट न्यायालयातून मिळवली 'कर्जमाफी', 'या' योजनांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना घेता येणार लाभ
- शेअर बाजारावर भाजपाच्या विजयाचा इफेक्ट; सेन्सेक्स प्रथमच 68,000 पार, गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत कमावले 4 लाख कोटी
- मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘रिचार्ज झोन’; योगा डॉग थेरपीसह आर्ट थेरपीचा समावेश