महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Metro Line 3 : मेट्रो रेल्वे लाइन तीनचे बीकेसी स्थानकाचे काम प्रगतीपथावर; अश्विनी भिडे यांनी केली पाहणी

मेट्रो रेल्वे लाइन तीनचे बीकेसी स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो रेल्वे चे स्थानक अंतिम टप्प्यात मेट्रो दोन ब मेट्रो लाईन 3 जोडली जाणार आहे. या कामाचे मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी नुकतीच पाहणी केली आहे.

By

Published : Jan 27, 2023, 12:29 PM IST

Mumbai Metro Line
मेट्रो रेल्वे लाइन तीन

मेट्रो रेल्वे लाइन तीनचे बिकेसी स्थानक काम प्रगतीपथावर

मुंबई:शिंदे फडणवीस सरकार यांनी सत्ता स्थापन केल्यावर मुंबई मेट्रो मार्गीकातील याबद्दलच्या अनेक मंजुरी तातडीने दिल्या आहेत. आता महत्त्वाचे रेल्वे स्थानक जे पूर्व उपनगर पश्चिम उपनगर आणि मध्य रेल्वेतील उपनगरांना जोडणारे स्थान म्हणजे वांद्रे कुर्ला संकुल मेट्रो रेल्वे लाईनचे स्थानक आहे. आता हे मेट्रो लाईन दोन व सोबत देखील जोडले जाणार आहे. त्यामुळे कुर्ला मानखुर चेंबूर येथे पश्चिम उपग्रह नगरातून पटकन जाता आणि येता येणार आहे.



सर्वात मोठे रेल्वे स्थानक: वांद्रे कुर्ला मेट्रो रेल्वे स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे असणा आहे, याचे कारण मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग हा बहुतांशी भुयारी आहे. एकच रेल्वे स्थानक वरती आहेत. वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुलात येत्या काळात बुलेट ट्रेनचे देखील रेल्वे स्थानक होणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रेल्वे स्थानकाला महत्त्व प्राप्त झाले. स्थानकाची लांबी 474 मीटर लांब आणि 32.5 मीटर रुंद आहे. मेट्रो रेल्वेच्या संदर्भातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असेल.


प्रगती सुरू: मेट्रो रेल्वे मार्गीका तीनबाबत आता काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. अनेक प्रकारचे तांत्रिक स्थापत्य कामे हे शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. झपाट्याने त्यावर प्रगती सुरू आहे. हे काम प्रत्यक्ष पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातून कोणालाही मध्य रेल्वेवर किंवा हार्बर रेल्वेला देखील पटकन जाता येणार आहे. या मार्गिका तीनमुळे अरे जंगलाजवळील सारीपूत नगर या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जे स्थानक आहे, तिथून तर वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी सहजता येईल.

रेल्वेच्या आजूबाजूचा परिसर:मेट्रो रेल्वे मार्ग तीनमुळे मेट्रो मार्ग दोन ब याच्यासोबत देखील जोडले जाणार आहे. पुढील काळामध्ये इएसआयसी नगर ते मंडला हा जो परिसर आहे, जो मानखुर उपनगरामध्ये हार्बर रेल्वेच्या आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखला जातो. इथपर्यंत मेट्रो दोन व जाणार आहे. त्यामुळे आता मेट्रो रेल्वेने दक्षिण मुंबईतून येऊन त्वरेने पश्चिम उपनगर मध्य रेल्वेवरील उपनगर आणि पूर्व उपनगर या ठिकाणी सहज जाता येऊ शकेल.


मार्गावर २७ स्थानके: कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर २७ स्थानके आहे. त्यापैकी २६ भुयारी व १ जमिनीवर आहे. कफ परेड ते विधान भवन चर्चगेट, हुतात्मा चौक ज्या ठिकाणी अनेक कॉर्पोरेट कार्यालय आहेत. शासकीय किंवा निमशासकीय कार्यालय आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते काळबादेवी ते गिरगाव, ग्रँड रोड मुंबई सेंट्रल महालक्ष्मी नेहरू तारांगण, आचार्य अत्रे चौक ते वरळी प्रभादेवी दादर, शितलादेवी धारावी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, सांताक्रुज, डोमेस्टिक विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका ते एमआयडीसी, सीब्स आणि शेवटचे रेल्वे स्थानक आरे डेपो असणार आहे.




कामे अंतिम टप्प्यांमध्ये: या संदर्भात मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालिका अश्विनी भिडे यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाने वेळोवेळी अनेक प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार वांद्रे कुर्ला संकुलामध्ये मेट्रो रेल्वे मार्गीका 300 स्थानक होत आहे. त्याचे काम स्थापत्य काम आणि इतर कामे अंतिम टप्प्यांमध्ये आहे, हे लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा लाभ घेता येईल.

हेही वाचा: How To Use Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताना घ्या 'अशी' काळजी नाहीतर व्हाल कर्जबाजारी

ABOUT THE AUTHOR

...view details