मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकावर सरकता जिना उलट्या बाजूने फिरल्याने दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. यावेळी प्रवाशांना दोन वर्षांपूवी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची आठवण ताजी झाली. पूर्वी जिन्यामुळे आणि आता सरकत्या जिन्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना होत आहे. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रेल यात्री परिषदेने केली आहे.
अंधेरी रेल्वे स्थानकातील सरकता जिना दुर्घटना; रेल यात्री परिषदेची कारवाईची मागणी - अंधेरी रेल्वे स्थानकातील सरकता जिना दुर्घटना
18 फेब्रुवारीला अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील सरकत्या जिन्याच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी, प्रवासी चढत असताना जिना वरच्या दिशेने जाण्याऐवजी अचानक खालच्या दिशेने गेला. यात दोन प्रवासी जखमी झाले. या घटनेची चौकशी करून कारवाईची मागणी रेल यात्री परिषदेने केली आहे.
हेही वाचा -अखेर महापोर्टल बंद; ठाकरे सरकारच्या निर्णयाने फडणवीसांना दणका
यंदाच्या अर्थसंकल्पात प्रवासीभिमुख सुविधांसाठी अनेक तरतूदी केल्या आहेत. यामध्ये सरकत्या जिन्यांसाठी 279 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 18 फेब्रुवारीला अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील सरकत्या जिन्याच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी, प्रवासी चढत असताना जिना वरच्या दिशेने जाण्याऐवजी अचानक खालच्या दिशेने गेला. यात दोन प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर 17 सरकत्या जिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.