मुंबई - गेल्या एका महिन्यापासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे. परिणामी लाखो मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या रोजच्या खोळंब्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या रोजच्या खोळंब्यावर श्वेतपत्रिका काढावी - खासदार राहुल शेवाळे - दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे
रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या रोजच्या खोळंब्यावर श्वेतपत्रिका काढावी तसेच तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या जनरल मॅनेजरपदी मराठी अधिकाऱयाची नियुक्ती करण्याची मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
रेल्वेच्या अनियमितपणामुळे नोकरदारवर्गाला कामावर जायला तसेच घरी परतण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे अनेकांना कामावर लेटलतीफचा शिक्का बसत आहे. तर काहींचे त्यादिवशीचे वेतनही कापण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्र्यालयाकडून श्वेत पत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.
मागील तीन महिन्यापासून रेल्वेचे जनरल मॅनेजरचे पद रिक्त आहे. या पदावर मराठी अधिकाऱयाचीच नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरचे पद रिक्त असल्यामुळे रेल्वेच्या अनियमिततेची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही तयार नाही. गैरमराठी अधिकाऱयांना येथील समस्यांची जाण नसल्याने ते कायमस्वरुपी तोडगा काढू शकले नाही. त्यामुळे मराठी व्यक्ती पदावर असल्यास मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.