मुंबई - जगाच्या पाठीवर देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी वडाळा मतदारसंघातील जनतेशी पायी संवाद साधताना ते बोलत होते.
'देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या मोदींना पुन्हा पंतप्रधान करा' - shivsena
देशाला गौरवशाली प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
वडाळा मुंबई येथील मरीआई गावदेवीचे दर्शन घेऊन शेवाळे यांनी आपल्या उमेदवारी क्षेत्रात येणाऱ्या धारावी तालुक्यातून मंगळवारी प्रचाराला सुरुवात केली. आज वडाळा मतदारसंघात त्यांनी आपल्या प्रचारासाठी पायी चालत प्रचार केला.
वडाळा येथील युतीच्या कार्यालयात शेवाळे यांचे स्वागत केल्यानंतर मरीआई गावदेवी मंदिर येथून प्रचाराला सुरुवात केली. त्यांनतर नाथालाल पारेख मार्ग, डॉ. आंबेडकर मार्ग, लेडी जहांगीर रोड, रुईया कॉलेज मार्ग, शांती निकेतन, हिंदू कॉलनी, टिळक ब्रिज नाका, अशी पदयात्रा काढून शेवाळे यांनी मतदारांशी संवाद साधला. 'देशाला गौरवशाली प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने युतीच्या उमेदवाराला मतदान करा,' असेही शेवाळे म्हणाले. या प्रचार पदयात्रेत मोठ्या प्रमाणात भाजप, शिवसेना आरपीआयचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी दक्षिण मुंबईत असलेल्या राहुल शेवाळे यांना विजयी करा, अशा घोषणा देण्यात आल्या.