महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इतिहास बदलणार; पुन्हा खासदार होणार - राहुल शेवाळे - भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राहुल शेवाळे

२०१४ ची लोकसभा निवडणूक ही मोदीलाटेबरोबर काँग्रेस विरोधी लाट होती. लोकांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मतदारांनी सत्तापरीवर्तन केले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेतील चांगल्या कामाची शिदोरी आमच्याकडे असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले.

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राहुल शेवाळे

By

Published : Mar 30, 2019, 3:14 PM IST

Updated : Mar 31, 2019, 10:46 AM IST

मुंबई- दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राहुल शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दादर-माहीमसह शिवसेनेचा बालेकिल्ला या मतदारसंघात आहे. शेवाळे यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी असली तरी त्याचा कितपत परिणाम होतो? यावरही बरेच अवलंबून आहे. त्यासाठीच त्यांच्याशी चर्चा केली ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी...

दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार राहुल शेवाळे

२०१४ ची लोकसभा निवडणूक ही मोदीलाटेबरोबर काँग्रेस विरोधी लाट होती. लोकांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मतदारांनी सत्तापरीवर्तन केले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेतील चांगल्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे. सध्या संपूर्ण देशात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण आहे. शिवसेनेनी व्यापक राष्ट्रहीत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुती केली आहे, असे राहुल शेवाळे म्हणाले.

धारावी पुर्नविकास प्रकल्प पुर्नविकास हा आर्थिक कारणामुळे आणि पुर्नवसनामुळे रखडला होता. मोकळी जागा नसल्याने पुर्नवसन कसे होणार? असा प्रश्न होता. आता ऐतिहासिक निर्णय झाले आहे. पुर्नवसनासाठी २५ हजार कोटी लागणार आहे. त्याची व्यवस्था आंतराष्ट्रीय वित्तीय संस्था करणार आहे. रेल्वेच्या ४५ एकर मोकळ्या जागेत धारावीतील प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन होणार आहे. आता येत्या ७ वर्षात धारावी पुर्नवसन निश्चितपणे पूर्ण होणार आहे.

खासदार निधीबाबात बोलताना शेवाळे म्हणाले, मला मंजूर झालेला खासदार निधी १०० ट्क्के खर्च झाला आहे. मार्चच्या शेवची संपूर्ण २५ कोटीचा निधी खर्च झालेला दिसेल. समाजमंदीर, रेल्वे स्टेशनलगतच्या प्रवासी सुविधा, शैक्षणिक संस्था, उद्याने, रुग्णालयातील उपकरणे पायाभुत सुविधांसाठी खासदार निधी खर्च झाला असल्याचे ते म्हणाले.
घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहे. या दोघांना मानणारे माझे मतदार आहे. त्यामुळे एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही. हा इतिहास बदलून मीच पुन्हा खासदार होणार, असा विश्वास राहुल शेवाळेंनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Mar 31, 2019, 10:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details