महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विकास आराखड्याची योग्य अंमलबजावणी केली तरच मुंबईचा विकास शक्य - शेवाळे

काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार आणि आमच्या कामाच्या पराकाष्ठेमुळेच मी २०१४ साली खासदार झालो. मात्र, यावेळची निवडणूक वेगळी आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंनी केले.

By

Published : Apr 5, 2019, 11:04 PM IST

राहुल शेवाळे

मुंबई - काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार आणि आमच्या कामाच्या पराकाष्ठेमुळेच मी २०१४ साली खासदार म्हणून निवडून आलो. मात्र, आत्ताची निवडणूक ही वेगळी आहे, असे मत शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मराठी पत्रकार संघात झालेल्या चर्चेमध्ये व्यक्त केले.

राहुल शेवाळे

विकास आराखडा तयार करुन काम करण्यावर भर दिल्यामुळे मागील ५ वर्षात विभागातील ६ विधानसभा क्षेत्रांमध्ये चांगले काम करता आले आहे. आधीच्या सरकारच्या काळात कोणत्याही प्रकारची नियोजनबद्ध कामे झालेली नव्हती. त्यामुळे विकास आराखडा तयार करुनच मुंबईतील विकासकामे करता येणे शक्य आहे. येत्या काळात विकास आराखडा केंद्र सरकारकडे सादर करुन स्पेशल पॅकेज मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल, असे शेवाळेंनी सांगितले.

मुंबईतील ४० टक्के जागा ही मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येते. तर उर्वरित जागा ही केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे विकास आराखडा राबवण्यासाठी एकमेकांशी ताळमेळ साधूनच विकास शक्य आहे. बी. पी. टी. वसाहतींच्या प्लॅननुसार स्थानिकांचे सर्वांचे पुर्नवसन होणार आहे. धारावीचा पुर्नंविकासाठी ४५ एकर जागेचा पाठपुरावा केल्यामुळे त्याला मंजुरी मिळाली आहे. गोवंडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केल्यामुळे ते आता पूर्णपणे बंद होणार आहे.

राज ठाकरे यांच्याबाबत विचारले असता, मनसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रचार करणार, अशी बातमी टीव्हीवर दाखवली जात आहे. मात्र, मनसेचे काही कार्यकर्ते यामुळे नाराज असून ते काँग्रेसला मतदान करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details