महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावीतील इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करा - राहुल शेवाळे - mumbai-building-collapse

रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीची लोखंडी परात अचानक कोसळली. यावेळी इमारती समोरील रस्त्यावरून जाणारा ३७ वर्षीय रिक्षाचालक शहादत अन्सारी याच्या रिक्षावर हा लोखंडी भाग कोसळला.

राहुल शेवाळे

By

Published : Apr 15, 2019, 12:48 PM IST

मुंबई - धारावी परिसरातील सेक्टर ५ मधील पीएमजीपी कॉलनी येथे बांधकाम सुरू असलेल्या २० मजली इमारतीची लोखंडी परात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी आहेत. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सायन रुग्णालयात जाऊन मृताच्या आणि जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली. या दुर्घटनेला जबाबदार असलेला कंत्राटदार शिर्के आणि म्हाडा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेवाळे यांनी केली आहे.

धारावीतील इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करा - राहुल शेवाळे


धारावीतील सेक्टर ५ मधील पीएमजीपी कॉलनी येथे २० मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीची लोखंडी परात अचानक कोसळली. यावेळी इमारती समोरील रस्त्यावरून जाणारा ३७ वर्षीय रिक्षाचालक शहादत अन्सारी याच्या रिक्षावर हा लोखंडी भाग कोसळला. यात अन्सारी याचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details