मुंबई: महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीही चुकणार नाही. मुंबईतल्या काही ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी (Income tax department raids) पडल्या आहेत. यामध्ये राहुल कनाल या नावाच्या व्यक्तीच्या घरी देखील धाडी पडल्या. मुंबईत केवळ एका जागीच हुक्का पार्लर चालतो. तो पार्लर राहुल कनाल याचा आहे. मुंबई महानगरपालिकेचे अनेक कॉन्ट्रॅक्ट राहुल कनाल या व्यक्तीलाच मिळतात. यामागे नेमकं कारण काय?
मुंबईत चार ते पाच हॉटेल राहुल कनाल यांच्या मालकीच्या आहेत. त्यांचे वडील दंतचिकित्सक आहेत. असे असताना त्याने ही माया कशी जमवली? त्यांचे कोणत्या राजकीय व्यक्तींसोबत संबंध आहेत याचा खुलासा झाला पाहिजे. राहुल कनाल याच्यावरच आयकर विभागाने धाड का टाकली?असा प्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यानी उपस्थित केला आहे.