महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची उच्च न्यायालयात धाव; गोरेगाव न्यायालयातील जुन्या याचिकेला स्थगितीची मागणी - Rahul Gandhi

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करत असताना आक्षेपार्ह भाषा वापरली, असा मुंबईत गुन्हा दाखल झाला होता. याबाबत राहुल गांधी यांच्यावर मुंबईतील गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी 2021 मध्येच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राहुल गांधी यांच्या विरोधात गोरेगाव न्यायालयाची 2019 या काळातली तक्रार दाखल आहे. त्याला स्थगिती मिळावी म्हणून ही याचिका दाखल आहे.

Goregaon Court
गोरेगाव न्यायालय

By

Published : Mar 16, 2023, 8:15 AM IST

Updated : Mar 16, 2023, 8:25 AM IST

मुंबई :भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महेश श्रीसिमल यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबईत तक्रार केली होती. दाखल केलेल्या तक्रारीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्याबाबत अवमानकारक भाषेत टीका केली, असा त्यांचा आरोप आहे. यासंबंधी ही तक्रार दाखल केली होती. मात्र स्थानिक न्यायालयाने जेव्हा राहुल गांधी यांना समन्स बजावले तेव्हा राहुल गांधी यांनी, यासंदर्भात माझ्याविषयी कोणी तक्रार केली. हे मला अद्याप माहितीच नाही. त्यामुळे तेव्हा केलेल्या याचिकामध्ये ही तक्रार फेटाळून लावा, असे म्हटले होते. आता त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत सुनावणी होणार आहे. ही सुनावणी होणार का? आणि स्थगिती मिळते का? हे आज समजेल.



उच्च न्यायालयामध्ये धाव :जेव्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्याबाबत टीका केली. तर याचिकाकर्ते तक्रारदार यांचे म्हणणे होते की, ही भाषा बरोबर नाही तर मानहानी करणारी आहे. तक्रारदार महेश श्रीसिमल यांनी त्यावेळेला गिरगाव न्यायालयात ती तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार गिरगाव न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यावेळेला हजर राहण्यासाठीचे निर्देश दिले होते. परंतु गिरगाव न्यायालयाने दिलेल्या निर्देशांविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.

कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती द्यावी : तसेच या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय देईपर्यंत गिरगाव न्यायालयाच्या सुरू केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती द्यावी; अशी देखील मागणी त्यावेळेला राहुल गांधी यांनी केली होती. त्याच याचिकेची सुनावणी 16 मार्च 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केली जाणार आहे. यात राहुल गांधी विरुद्ध महाराष्ट्र राज्य अशी ही याचिका सुनावणीस आहे. या याचीकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मोदी शासनाच्या दुसऱ्या कार्य काळामध्ये राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावरून देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली होती.

हेही वाचा : Shinde Vs Thackeray In SC : सत्तासंघर्षाची सर्वोच्च लढाई! राज्यपालांच्या भूमिकेवर न्यायालयाने उपस्थित केले कळीचे प्रश्न

Last Updated : Mar 16, 2023, 8:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details