मुंबई - राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे, त्यांची गरज केवळ पक्षासाठी नाही तर देशासाठी आहे, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना केली आहे.
राहुल गांधी यांचं नेतृत्व हे एक समर्थ नेतृत्व आहे. हेच नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारे आहे. या देशाला तेच समर्थपणे नेतृत्व देऊ शकतात. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि अध्यक्षपदी स्वीकारावे, अशी मागणीही थोरात यांनी एक ट्विट करून आणि त्यानंतर राहुल गांधी यांना एक विनंतीचे पत्र लिहून केली आहे.
सध्या अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांनीही आपल्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाच्या उभारणी संदर्भात आणि पक्षासाठी अत्यंत चांगलं काम केलेला आहे. त्यांना पाहिजे तोपर्यंत अध्यक्ष राहतील, परंतु काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांनी तयार झाले पाहिजे, देशाचे एकूणच हित लक्षात घेऊन त्यांनी यासाठीचा निर्णय घ्यावा, आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.