मुंबई Rahul Gandhi Controversial Speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप राजेश कुंटे यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. या विरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र आव्हान याचिकेवर राजेश कुंटे यांनी 5 जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर एन लढ्ढा यांनी 12 डिसेंबरला दिले आहेत.
राहुल गांधी यांचं वादग्रस्त विधान :महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, असं वादग्रस्त विधान राहुल गांधी यांनी सार्वजनिक सभेत केल्याचा आरोप राजेश कुंटे यांनी केला होता. राहुल गांधी यांचं ते विधान म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी आहे. म्हणूनच राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खटला दाखल करण्यात आला होता.
राजेश कुंटेंना उत्तर दाखल करण्याचे आदेश :काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं होते. त्या विधानानंतर त्यांच्याविरोधात राहुल कुंटे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत खटला देखील दाखल झाला होता. मात्र राहुल गांधी यांनी तो खटला रद्द करण्यासंदर्भातील आव्हान याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या आव्हान याचिकेवर आता मूळ तक्रारदार राजेश कुंटे यांनी उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहे. 5 जानेवारी 2024 पर्यंत राजेश कुंटे यांना हे उत्तर दाखल करायचं आहे.
न्यायालयानं निश्चित केली खटल्याची सुनावणी :ट्रायल कोर्टानं 2021 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता राजेश कुंटे यांना राहुल गांधी यांच्या 2014 च्या एका याचिकेतील काही दस्तऐवज जोडण्याची विनंती नाकारली होती. या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला राजेश कुंटे यांनी आव्हान दिलं होतं. राजेश कुंटे यांचं म्हणणं मान्य करून उच्च न्यायालयानं राजेश कुंटेना मुंबई उच्च न्यायालयात राहुल गांधी यांच्यावर आधारित खटला दाखल करण्याची अनुमती दिली होती. 5 जानेवारी 2024 पर्यंत राजेश कुंटे यांना उत्तर दाखल करावयाचे आहे. 10 जानेवारी 2024 रोजी या खटल्याची सुनावणी न्यायालयानं निश्चित केलेली आहे.
हेही वाचा :
- "आपण विश्वचषक जवळपास जिंकलाच होता, मात्र 'पनौती'मुळे...", राहुल गांधींची मोदींवर नाव न घेता टीका
- Rahul Gandhi On BJP : हिंदू धर्माशी भाजपाचा काहीही संबंध नाही, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
- 'पनौती', 'पाकिटमार' प्रकरणी निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस