महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी सर्वाथाने योग्य उमेदवार - सॅम पित्रोदा - door

सॅम पित्रोदा यांनी शुक्रवारी प्रोफेशनल काँग्रेस या काँग्रेसच्या आघाडीच्या आणि शनिवारी मुंबई प्रेस क्लबच्या वार्तालापात काँग्रेसचा जाहीरनामा, राहुल गांधी यांचे नेतृत्व, रोजगार निर्मिती यावर मोकळी चर्चा केली.

राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार

By

Published : Apr 7, 2019, 10:16 AM IST

मुंबई - काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे पंतप्रधान पदासाठी सर्वाथाने योग्य आहेत. अशा शब्दात भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी राहूल गांधी यांच्या पंतप्रधान पदावरील उमेदवारीचे समर्थन केले. मुंबईत आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसने ७० वर्षात देशाची उभारणी केली आणि प्रगत देशाची उभारणी केली, असेही स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.

राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार


सॅम पित्रोदा यांनी शुक्रवारी प्रोफेशनल काँग्रेस या काँग्रेसच्या आघाडीच्या आणि शनिवारी मुंबई प्रेस क्लबच्या वार्तालापात काँग्रेसचा जाहीरनामा, राहुल गांधी यांचे नेतृत्व, रोजगार निर्मिती यावर मोकळी चर्चा केली. राहुल गांधी हे पप्पू असल्याचा प्रचार केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पंतप्रधान पदासाठी कितपत पात्र आहेत, असे त्यांना विचारण्यात आले. राहुल गांधी यांना बालपणापासून मी ओळखतो. ते अतिशय सभ्य आणि चांगले गृहस्थ आहेत. त्यांच्यात विकासाची दृष्टी आहे. ते अत्यंत अभ्यासू आहेत, खूप वाचन करतात. विद्यमान पंतप्रधान कुणाचेच ऐकत नाहीत. याउलट राहूल हे सर्वांचे ऐकून घेतात आणि नंतर निर्णय घेतात, असे पित्रोदा म्हणाले.


आघाडीसाठी दरवाजा आणि खिडकी उघडी
देशपातळीवर विविध पक्षाशी आघाडी करण्यात काँग्रेस पक्ष कमी पडल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. उत्तर प्रदेशात सहयोगी पक्षानी अवास्तव मागण्या केल्या आणि ते तडजोड करायला तयार नव्हते, असे ते म्हणाले. मात्र अजूनही आघाडीसाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या असल्याचे त्यांनी सांगितले.


ईव्हीएममध्ये काही तरी घोळ
एक तंत्रज्ञ म्हणून मला ईव्हीएममध्ये तरी काही घोळ असल्याचे वाटते. घोळ नेमका काय आहे हे मला सांगता येणार नाही. मात्र सध्या जे ईव्हीएम वापरले जाताहेत त्यांचे डिझाईन १५ वर्ष जुने आहेत. एवढे जुने मोबाईल वापरत नाहीत तर ईव्हीएम का वापरतोय? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

ABOUT THE AUTHOR

...view details