महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhabria In CBI custody : रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना 13 मेपर्यंत सीबीआय कोठडी - डीएचएफएल घोटाळा

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया (Radius Group's Sanjay Chhabria) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हजर केले असता त्यांना 7 दिवसाची म्हणजे 13 में पर्यंत पुन्हा सीबीआय कोठडी (remanded in CBI custody ) पाठवण्यात आले आहे. येस बँक (Yes Bank) आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी (DHFL scam) सीबीआयने त्यांना 28 एप्रिल रोजी अटक केली होती.

Sanjay Chhabria
संजय छाब्रिया

By

Published : May 6, 2022, 7:24 PM IST

मुंबई: प्रसिद्ध व्यवसायिक संजय छाब्रिया यांना 28 एप्रिल रोजी सीबीआयने मुंबईत अटक केली. त्यानंतर 29 एप्रिल रोजी मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हजर केले असता त्यांना 13 दिवसाची सीबीआय कोठडी रवानगी करण्यात आली होती. आज त्यांचे सीबीआय कोठडी संपल्याने त्यांना आज पुन्हा हजर केले आज सीबीआयने त्यांची 7 दिवसाची पुन्हा सीबीआय कोठडी मागितल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीशांनी त्यांची 7 दिवसासाठी सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.

संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर सीबीआयने मुंबई, पुणे या ठिकाणी छापेमारी केली होती. येस बँकेच्या 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. डीएचएफएल या फायनान्स कंपनीने येस बँकेकडून 3हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ही कंपनी नंतर दिवाळखोरीत दाखवून हे कर्ज बुडवण्यात आले. या कर्जाचा मोठा हिस्सा हा रेडियस ग्रुपला देण्यात आला होता. येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हे कनेक्शन उघड झाले असून सीबीआयने ही कारवाई केली आहे.

काही महिन्यांपूर्वी संजय छाब्रिया यांच्या रेडियस या ग्रुपवर सीबीआयने छापेमारील केली होती. तेव्हापासूनच त्यांना अटक होणार अशी चर्चा होती. संजय छाब्रिया यांनी बीकेसीमधे एक बिल्डिंग बांधली होती. त्यामध्ये अनेक राजकारण्याचे कनेक्शन असल्याचा सीबीआयला संशय आला. त्यामुळे सीबीआयच्या या कारवाईमुळे आता अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटप यामुळे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर गेल्या वर्षी 5 मार्चपासून निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले.

हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांची पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली होती. राणा कपूर बँकेचे सीईओ असताना सुमारे 30 हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप झाले होते. यापैकी 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर त्याने सुमारे 202.10 कोटी रुपयांची कर्ज दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे.

हेही वाचा :Warrant against Raj Thackeray : ८३ वेळा तारखा, सततची गैरहजेरी राज ठाकरेंच्या विरोधात अखेर अटक वाॅरंट

ABOUT THE AUTHOR

...view details