मुंबई- दिवसेंदिवस मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा अपुरे पडू नये, म्हणून अनेक संस्था आपल्या जागा सरकारला देण्यासाठी पुढे आल्या आहेत. मुंबईतील मालवणी परिसरातील 'द यंग मुस्लिम असोसिएशन'नेही त्यांच्या 'अंजुम-ए-जामा' मस्जिदची ईदगाह म्हणून शिल्लक असलेली जागा राज्य सरकारला क्वारंटाईन सेंटरसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मालवणीच्या मस्जिदची जागा क्वारंटाईन सेंटरसाठी उपलब्ध - कोरना विषाणू
एकीकडे देश व राज्य कोरोनाच्या संकटात लढा देत आहे. अशातच आपणही समाजाचे देणे लागतो या सामाजिक भावनेतून देशसेवेसाठी अंजुम ए जामा मस्जिदच्या विश्वस्तांनी एकमताने क्वारंटाईन सेंटरसाठी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

'द यंग मुस्लिम असोसिएशन'ची 'अंजुम-ए-जामा' मस्जिदची मालाडच्या मालवणी परिसरात एकूण 15 हजार चौरसफूट जागा आहे. या जागेतील 8 हजार चौरस फुट जागा आम्ही नमाज अदा करण्यासाठी वापरतो, तर उर्वरित 7 हजार चौरस फूट जागा ईदगाह म्हणून शिल्लक आहे. ही जागा राज्य शासनाला कोरोनाच्या या युद्धात क्वारंटाईन सेंटरसाठी देत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले असल्याचे सचिव सय्यद रिजवान कादरी यांनी सांगितले आहे.