महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 25, 2020, 12:01 PM IST

ETV Bharat / state

कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करा; बांधकाममंत्री अशोक चव्हाणांचे निर्देश

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Review Meeting
आढावा बैठक

मुंबई - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

कोकणातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश अशोक चव्हाण यांनी दिले

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत चारही पालकमंत्र्यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या जिल्हानिहाय स्थितीबाबत अशोक चव्हाण यांना माहिती दिली. आवश्यक त्या रस्त्यांच्या दुरूस्तीसंदर्भातही अनेक सूचना मांडल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांसह संयुक्तपणे दौरा करून प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यकता असेल त्याठिकाणी रस्ते व पुलांच्या दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेऊन गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्तता करावी. पूर्वीपासून प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामे देखील विहीत कालावधीत पूर्ण करून घ्यावीत. ज्या ठिकाणी कामे अधिक काळ चालणार आहेत, त्याठिकाणी वळण रस्ता सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, असे निर्देश अशोक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details