मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांविरोधात उभा ठाकला आहे. टीकेची एकही संधी दोघांकडून सोडली जात नाही. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेयांच्या स्मृतिस्थळावरून (Balasaheb Thackeray memorial) राजकारण तापले आहे. शिंदे गटाने बाळासाहेबांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येला स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटाकडून शुद्धीकरण (Purge by the Thackeray group) करण्यात आले.
Balasaheb Thackeray: दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण - Uddhav Thackeray
दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरून (Balasaheb Thackeray memorial) राजकारण तापले आहे. शिंदे गटाने (Shinde Group) बाळासाहेबांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येला स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटाकडून शुद्धीकरण करण्यात आले.
दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या दहावा स्मृतिदिन आहे. दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर शिवसैनिकांकडून अभिवादन केले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बाळासाहेबांना नमन करण्यासाठी शिवसैनिकांची रीघ असते. यंदा शिवसेनेत दोन गट पडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपशी युती करत सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. शिवसेनेत दोन गट पडल्याने ठाकरे गटात शिंदेंविरोधात प्रचंड चीड आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर जाऊन अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या अभिवादानंतर ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण करण्यात आले. शिंदे गटाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.