मुंबई - शहरातील कोरोना हळूहळू आटोक्यात येत आहे. मुंबईत लसीकरणालाही सुरुवात होत आहे. मात्र, अद्याप शाळा सुरु करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरी मुंबई महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी २० कोटी रुपयांचे ७५ लाख मास्क खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या या निर्णयाला भाजपा आणि काँग्रेसने विरोध केला आहे. २० कोटी रुपये मास्कसाठी घालणे म्हणजे करदात्या नागरिकांच्या पैशाचा चुराडा करण्यासारखे असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. तसेच आगोदर विद्यार्थ्यांना लस द्या आणि मगच शाळा सुरु करा अशी मागणीही करण्यात आली आहे.
मुंबई; शाळा सुरु होण्याआधीच पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी ७५ लाख मास्कची खरेदी - covid 19 mumbai latest news
मुंबईत कोरोनाचा प्रसार असल्याने अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत. शाळा कशी सुरु होणार हे अद्याप निश्चित नाही. असे असताना पालिकेकडून २० कोटी रुपये खर्च करून ७५ लाख मास्कची खरेदी करणे म्हणजे करदात्यांच्या पैशांचा चुराडा करण्यासारख असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
२० कोटींच्या मास्कची खरेदी -
मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. त्यामुळे १५ जानेवारीनंतर मुंबईतील शाळा उघडतील असे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये २ लाख ९६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. शाळा सुरु झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग, तोंडावर मास्क लावणे या गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे. पालिका शाळांतील विद्यार्थी हे गरीब घरातील असून कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध व्हावे यासाठी २० कोटी रुपये खर्च करून मास्क खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
विरोधी पक्षांचा आक्षेप-
मुंबईत कोरोनाचा प्रसार असल्याने अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत. शाळा कशी सुरु होणार हे अद्याप निश्चित नाही. असे असताना पालिकेकडून २० कोटी रुपये खर्च करून ७५ लाख मास्कची खरेदी करणे म्हणजे करदात्यांच्या पैशांचा चुराडा करण्यासारख असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. एक मास्क ३० दिवस धुवून वापरता येणार आहे. एका विद्यार्थ्याला २५ मास्क मिळणार असून ते दोन वर्षे पुरतील इतके आहेत. कंत्राटदारचे भले करण्यासाठी मास्कचे कंत्राट दिले जात आहे. याला विरोध असल्याची माहिती काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा व भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी दिली. स्थायी समितीत या प्रस्तावाला विरोध केला जाईल असे भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.