मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्या निवासस्थानी त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
Phone Tapping Case : नाना पटोले यांचा जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलीस मुंबईत दाखल - रश्मी शुक्ला
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांचा जबाब नोंदवण्यासाठी ( record the statement of Nana Patole) पुणे पोलीस मुंबईत दाखल (Pune Police reaches Mumbai) झाले आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) त्यांच्या निवासस्थानी त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
![Phone Tapping Case : नाना पटोले यांचा जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलीस मुंबईत दाखल Nana Patole](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15219016-90-15219016-1651912279065.jpg)
फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा जबाब पोलीसांनी नोंदवला होता. मात्र, या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा मानहाणीच दावा दाखल करणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. रश्मी शुक्ला यांनी आपला फोन टॅप केल्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचे नाना पटोले यांनी सांगितले होते. तसेच या षडयंत्रामागे भाजप असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या सह शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचेही जवाब नोंदवण्यात आले आहेत.