मुंबई - लोणावळा कर्जत मार्गावरील मंकी हिल ते नागनाथ या 2 स्टेशनमधील दक्षिण घाट परिसरातील अप मार्गावर रेल्वे रूळ पावसात वाहून गेला होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून यामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. नवीन वर्षात 15 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
2 ऑक्टोबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनच्या मधील दक्षिण घाट परिसरातील अप मार्गावरील रेल्वे रूळ 4 किमी खाली वाहून गेला. दोन टनेलच्या मध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला वाहून गेलेला रुळाचा भाग पुन्हा दुरुस्ती करणे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आवाहन होते. त्यामुळे त्याच्या दुरुस्ती साठी रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच यामार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात आला. तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, पनवेल पुणे पनवेल पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. तर मुंबई कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई हैदराबाद, मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस, एलटीटी विशाखापट्टणम एल टी टी एक्सप्रेस, एलटीटी हुबळी, एलटीटी एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात नांदेड एक्सप्रेसच्या दर रविवारी फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा - बियाण्यावरील मक्तेदारी थांबवा..