मुंबई - मुंबई वा राज्यात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले असते. ते म्हणजे म्हाडाच्या लॉटरीकडे. त्यानुसार आता म्हाडाच्या पुणे मंडळाने पुण्यातील 5 हजार 647 घरासाठी लॉटरी जाहीर करत सर्वसामान्यांना मोठी खूशखबर दिली आहे. तर आजपासून या लॉटरीसाठी नोंदणीला, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेचा शुभारंभ आज आला.
आज 3 वाजल्यापासून या घरासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 22 जानेवारीला लॉटरी उघडणार आहे. इथे आहेत घरे पुणे मंडळाकडून 5647 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. तर यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या लॉटरीच्या जाहिरातीनुसार पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे येथे 514 घरे, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे 296 घरे, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे 77 घरे, सांगली येथे 74 घरांचा समावेश लॉटरीत आहे. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या मोरवाडी पिंपरी (पुणे) येथील 87 घरे, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील 992 घरे तर सांगली येथील 129 घरांचादेखील या लॉटरीत समावेश आहे. या लॉटरीत अत्यल्प , अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील 68 भूखंड देखील या लॉटरीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
11 जानेवारी पर्यंत करता येणार नोंदणी -