महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे मेट्रोची लवकरच होणार चाचणी; कोचच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - CM unveils pune Coach's replica in mumbai

ताशी कमाल ९० किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली आहे. तर दृकश्राव्य संदेशप्रणालीही यामध्ये उपलब्ध असणार आहे. हे कोच लवकरच मेट्रोच्या उन्नत मार्गावर चढवण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष गाडी धावण्याच्या चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत.

Pune metro test to be held soon; CM unveils Coach's replica in mumbai
कोचच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

By

Published : Dec 27, 2019, 9:42 PM IST

मुंबई - पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मेट्रोच्या कोचच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) सह्याद्री अतिथी गृहात अनावरण करण्यात आले. पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू आहे. मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. मेट्रोच्या चाचणीसाठी नागपूरहून पुण्यात हे कोच आणण्यात आले आहेत. या अनावरण कार्यक्रमाला नगरविकासमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

मेट्रोची प्रत्येक गाडी ही 3 कोचची आहे. एका गाडीतून ९५० ते ९७० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. 3 कोचपैकी 1 कोच महिलांसाठी राखीव आहे. तिन्ही कोच आतून एकमेकांना जोडलेले असल्यामुळे प्रवाशांना सहज एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणे शक्य होणार आहे. स्टेनलेस स्टीलने बनवलेले हे कोच वजनाला हलके आहेत. यामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. बाहेरील प्रकाशानुसार या दिव्यांची तीव्रता कमी-अधिक करणारी यंत्रणाही यात बसवण्यात आली आहे.

हेही वाचा -महाराष्ट्र एकीकरण समितीमधल्या एकाच्याही केसाला धक्का लागला तर गाठ सेनेशी - धैर्यशील माने

ताशी कमाल ९० किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली आहे. तर दृकश्राव्य संदेशप्रणालीही यामध्ये उपलब्ध असणार आहे. हे कोच लवकरच मेट्रोच्या उन्नत मार्गावर चढवण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष गाडी धावण्याच्या चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा -'त्या' नेत्यांनाही सीमेवर गोळ्या घाला, 'कर्नाटक नवनिर्माण सेना' अध्यक्षाचे वादग्रस्त विधान

पुणे मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याबद्दल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. जून २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या आत हा मार्ग मेट्रोची चाचणी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम, मार्ग टाकण्याचे काम, विजेच्या तारांचे काम, सिग्नल आणि अन्य कामे ३० महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आल्याबद्दल शिंदे यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details