पुणे - स्वच्छ सर्वेक्षण-2021च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. (clean survey 2021 winners announcement) देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे. मागील वर्षी पुण्याला 17व्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
या निकषांच्या आधारे पुरस्कार -
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. सन 2021रोजी कचऱ्याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आणि निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. यंदा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते स्वच्छ शहरांना प्रदान करण्यात आला आहे. (president ramnath kovind at clean survey awards 2021)
पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्रातील 2 शहरे -
स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या स्पर्धेमध्ये पुणे शहर 17व्या क्रमांकावर होते. दरम्यान, देशात पुन्हा एकदा इंदोरने बाजी पटकावर स्वच्छ शहरात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा, चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई असून पाचव्या क्रमांकावर पुण्याने झेप घेतली आहे. 10 लाखांवर लोकसंख्या असलेल्या 48 प्रमुख शहरांचा या सर्वेक्षणात समावेश होता.