मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1988 ते 1996 दरम्यान केलेल्या भाषणांपैकी निवडक 61 भाषणांचे 'नेमकचि बोलणें' हे पुस्तक (Publication of a book on Sharad Pawar speech) शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Sharad Pawar birthday ) प्रकाशित करण्यात आले. लेखक सुधीर भोंगळे यांनी शरद पवार यांची सर्व भाषणे आपल्याकडे संग्रहित करून ठेवली आहेत. त्या भाषणांपैकी 61 भाषणांचा पहिला खंड प्रकाशित करण्यात आला आहे. साहित्यिक रंगनाथ पठारे आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून या कार्यक्रमाला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.
शरद पवारांच्या जुन्या भाषणांचे 'नेमकचि बोलणें' पुस्तकाचे प्रकाशन, पवारांनी सांगितले अनेक किस्से - sharad pawar on bjp government
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन (Publication of a book on Sharad Pawar speech) सोहळा आज पार पडला. भोंगळेंनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'नेमकचि बोलणें' या पुस्तकाचं लेखन केलं आहे.
मुंबईतील नेहरू सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. या पुस्तकातील काही भाषणे साहित्यिक तसेच कलाक्षेत्रातील लोकांनी वाचून दाखवली. यावेळी वाचून दाखवलेल्या प्रत्येक भाषणाचा संदर्भ शरद पवार यांनी सांगितला. तसेच वाचून दाखवलेल्या भाषणानंतर शरद पवार यांना वाचक-श्रोत्यांनी प्रश्नही विचारले. त्या प्रश्नांना तेवढ्यात दिलखुलासपणे शरद पवार यांनी उत्तरेही दिली.
या कार्यक्रमा दरम्यान शरद पवार यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत चिंता व्यक्त केली असून महिला सुरक्षेच्या प्रश्नाबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं. सध्या देशामध्ये शाळेचा अभ्यासक्रम बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. ही चिंतेची बाब आहे. या मुद्द्यात जाणकारांनी लक्ष घालणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचा एक खासदार राम मंदिर बांधण्याचे काम झालं आहे आता अजून दोन महत्त्वाचे काम राहिली आहेत असं म्हणतात. ही गंभीर बाब असून बाबरी मशीद पडल्यानंतर देशामध्ये अशांतता निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच अशांतता तयार होऊ शकते का? याबाबत देखील शरद पवार यांनी शंका उपस्थित केली.
मराठी शाळेचा टक्का कमी होतोय -
तसेच राज्यातल्या मराठी शाळांबाबत शरद पवार यांनी (sharad pawar on marathi school) चिंता व्यक्त केली. सामान्यातला सामान्य नागरिक, तसेच शेतकरी, कष्टकरी यांनाही आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकावे अशी इच्छा आहे. त्याचा परिणाम मराठी शाळेवर होतोय. खास करून मुंबईमधील महानगरपालिकेच्या शाळांमधील मराठी टक्का घसरत असल्याची त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यकर्त्यांसह सर्वांनी मराठी शाळांबाबत आग्रहाची भूमिका घेणे गरजेचे असल्याचं मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.