मुंबई -राज्यात अनेक व्यसन मुक्ती केंद्रं आहेत. या व्यसन मुक्ती केंद्रात सध्या तीन हजारांपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक संस्था काम करत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता, त्यांना घरी सोडण्यात यावे, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तींना सोडावे; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल - Corona Effect
राज्यात कोरोना विषाणूचा झपाटाण्याने प्रादुर्भाव होत आहे. यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय आहे. मात्र, व्यसन मुक्ती केंद्रांमध्ये व्यसन जडलेल्या अनेक व्यक्ती एकाच ठिकाणी राहत आहेत. सध्या करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता, त्यांना घरी सोडण्यात यावे, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा झपाटाण्याने प्रादुर्भाव होत आहे. यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय आहे. मात्र, व्यसन मुक्ती केंद्रांमध्ये व्यसन जडलेल्या अनेक व्यक्ती एकाच ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
या व्यक्तींना व्यसनमुक्ती केंद्रातून काही काळासाठी सोडावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका प्रिया कुलकर्णी यांनी दाखल केली आहे. त्यांच्यावतीने अॅड. नितीन सातपुते हे युक्तिवाद करणार आहेत.