महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात दहा कोटी लोकांचे लसीकरण, आरोग्य मंत्र्यांची माहिती

राज्याने आज (दि. 9 नोव्हेंबर) कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दहा कोटीचा टप्पा पार केला. दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात लसीची पहिली मात्रा ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ तर दुसरी मात्रा ३ कोटील २० लाख ७४ हजार ५०४ देण्यात आल्या आहेत. एकूण १० कोटी १ लाख २७ हजार ५८१ लसीची मात्रा देण्यात आल्या आहेत.

मंत्री राजेश टोपे
मंत्री राजेश टोपे

By

Published : Nov 9, 2021, 9:12 PM IST

मुंबई -राज्याने आज (मंगळवार) कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दहा कोटीचा टप्पा पार केला. दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात लसीची पहिली मात्रा ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ तर दुसरी मात्रा ३ कोटील २० लाख ७४ हजार ५०४ देण्यात आल्या आहेत. एकूण १० कोटी १ लाख २७ हजार ५८१ लसीची मात्रा देण्यात आल्या आहेत. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच लसीकरण मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. लवकरच राज्यातील प्रत्येक नागरिकाला लशीच्या दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस सोळा जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येऊ लागले. लसीकरणाच्या वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य, अशी अभियान राबविण्यात आले.

हे ही वाचा -Corona Update - राज्यात 1293 रुग्णांना डिस्चार्ज, 982 नवे रुग्ण, 27 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details