मुंबई -मध्यप्रदेशमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धिंडला तिच्या घरच्यांचादेखील पाठींबा होता. कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकराचे संतापजनक ट्विट
या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मध्य प्रदेशमध्ये १६ वर्षांच्या बलात्कार पीडितेला तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासोबतच दोरीने बांधून जाहीर मिरवणूक काढण्यात आली. हा सर्व अत्याचार सुरु असताना ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जात होत्या? आपण (समाज म्हणून) इथपर्यंत कसे आलो? हे कृत्य अमानवीय आहे”, अशा आशयाचे ट्विट करत उर्मिला यांनी केले आहे.