मुंबई :पत्रकार शशिकांत वारीशे यांची राजापूर येथे जीप खाली चिरडून हत्या करण्यात आली. राजापूर परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि नागरीक यांच्या बाजूने पत्रकार म्हणून वारीशे यांनी सातत्याने लेखन केले त्यांच्या लेखनाने चिडून जाऊन स्थानिक गुंड असलेल्या रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी याने वारीचे यांच्या मोटरसायकलला मागून धडक देत त्यांच्या अंगावर गाडी घातली यामध्ये चिरडून जाऊन वारीशे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिकांच्या आणि पत्रकारांच्या आंदोलनानंतर आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार संघटनांचे मुंबईतील निदर्शन :वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आज विविध पत्रकार संघटनांच्या वतीने मुंबईतील मंत्रालयाजवळ काळ्याफिती लावून निदर्शने करण्यात आली. तसेच मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे संजय परब यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पीडित वारीशे कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची तातडीची मदत सरकारने द्यावी अशी मागणी केली. गुंड आंबेरकर याच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी. यापुढे सर्व पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी सरकारने लक्ष घालावे अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली.