महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Protest Against Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला मारले जोडे; वंचित बहुजन आघाडी आक्रमक - मंत्री चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला मारले जोडे

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Protest against BJP leader Chandrakant Patil) यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे (regarding Controversial statement) पडसाद संपूर्ण महाराष्ट्राभर उमटू लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) पक्षाच्या माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई सानपाडा सेक्टर 3 मध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Protest Against Chandrakant Patil
वंचित बहुजन आघाडी आक्रमक

By

Published : Dec 11, 2022, 4:39 PM IST

प्रतिक्रिया देतांना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते

नवी मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Protest against BJP leader Chandrakant Patil) यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे (regarding Controversial statement) पडसाद संपूर्ण महाराष्ट्राभर उमटू लागले आहेत. पाटील यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) देखील आक्रमक झाली आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई सानपाडा सेक्टर 3 मध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला चपला मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.


माथाडी युनियनने केले आंदोलन : चंद्रकांत पाटील यांनी संभाजीनगर मधील पैठण येथील एका कार्यक्रमात महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी राज्य सरकार आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या माथाडी युनियनने हे आंदोलन केले.

वादग्रस्त विधाने खपवून घेणार नाही : या आंदोलनादरम्यान पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारले. चंद्रकांत पाटलांनी आपले वक्तव्य मागे घेऊन, जाहिर माफी मागण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच पाटील यांच्या मंत्री पदाचा राजीनामा देखील मागितला गेला. राजीनामा न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आमच्या आदर्श महापुरुषांसंदर्भात अशी वादग्रस्त विधाने खपवून घेणार नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले. या जोडे मारो आंदोलनात माथाडी युनियनच्या नवी मुंबई सल्लागार ऍड. जानकी आनंध, महाराष्ट्र महासचिव सुरेश मोहिते, नवी मुंबई सरचिटणीस अरुण राजपूत, नवी मुंबई उपाध्यक्ष अमित भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details