महाराष्ट्र

maharashtra

गारगाई प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव अडकला आचारसंहितेत

मुंबईच्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी महापालिकेने पालघर येथील गारगाई नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४२६ हेक्टर जागेवरील ६१९ कुटुंबाचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्यात येणार आहे.

By

Published : Sep 29, 2019, 11:47 PM IST

Published : Sep 29, 2019, 11:47 PM IST

सदानंद परब, अध्यक्ष सुधार समिती

मुंबई -राज्याची राजधानी मुंबईच्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी महापालिकेने पालघर येथील गारगाई नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४२६ हेक्टर खासगी जमीन खरेदी केली जाणार आहे.

गारगाई प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आचारसंहितेत अडकला आहे


४२६ हेक्टर जागेवरील ६१९ कुटुंबाचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका १४८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र, हा प्रस्ताव आचारसंहितेमध्ये अडकला आहे. विधानसभा निवडणुकीनंतरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते, अशी माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

हेही वाचा - 'संभाजी भिडे यांनी या वयात बालिश वक्तव्य करू नये'


सात धरणांमधून मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लिटर पाणी पुरावठा केला जातो. मात्र, हा पाणीपुरवठा कमी असल्याने महानगरपालिकेने गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर ६९ मीटर उंच व ९७२ मीटर लांबीचे धरण बांधले जाणार आहे. या धरणातून मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे.

हेही वाचा - गांधीजयंतीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची घोषणा

गारगाई पाणी प्रकल्पात, वाडा तालुक्यातील ओगदे, खोडदे ही गावे पूर्णतः बाधित होणार आहेत. तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत. गारगाई प्रकल्प तानसा वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारित क्षेत्रात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि वन मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details