महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Professor Opposed To UGC Course यूजीसीने जारी केलेल्या प्राध्यापकांच्या नवीन इंडक्शन अभ्यासक्रमाला प्राध्यापकांचा आक्षेप - जगाच्या ज्ञानाचा आधार प्राचीन भारतातील परंपरा

विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC New Induction Refresher Course ) प्राध्यापकांसाठी नवीन इंडक्शन अभ्यासक्रम जारी केला आहे. या अभ्यासक्रमाला प्राध्यापकांचा विरोध होत आहे. प्राचीन भारतातील ज्ञानव्यवस्था आणि आधुनिक भारतातील ( Professor Opposed To UGC Induction Refresher Course ) ज्ञानव्यवस्था यांचा एकत्रितपणे विचार करून विद्यार्थ्यांना शिकवावे, असे या अभ्यासक्रमात नमूद आहे. मात्र प्राध्यापकांनी या पद्धतीला आक्षेप घेत इतिहासाशी फारकत घेणारी गंभीर चूक या अभ्यासक्रमात असल्याचे नमूद केले आहे.

Professor Opposed To UGC Course
विद्यापीठ अनुदान आयोग

By

Published : Dec 31, 2022, 8:00 PM IST

मुंबई -विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच प्राध्यापकांसाठी इंडक्शन अभ्यासक्रम लागू ( UGC New Induction Refresher Course ) केला आहे. या अभ्यासक्रमामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम या नावाने हा अभ्यासक्रम प्राध्यापकांनी शिकायचा आहे. त्यानंतर मग तो महाविद्यालयात ( Professor Opposed To UGC Induction Refresher Course ) विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. परंतु या अभ्यासक्रमास प्राध्यापकांचा आक्षेप असल्याचे दिसून येत आहे.

इंडियन नॉलेज सिस्टीम आराखडा इंडियन नॉलेज सिस्टीम अर्थात भारतीय ज्ञान प्रणाली या नावाने विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांसाठी रिफ्रेशर्स कोर्स ( Induction Refresher Course In Maharashtra ) सुरू केला आहे. त्यानुसार इंडक्शन अभ्यासक्रमाचा नवीन मार्गदर्शक आराखडा जारी केलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्राचीन भारतातील ज्ञानव्यवस्था आणि आधुनिक भारतातील ज्ञानव्यवस्था यांचा एकत्रितपणे विचार करून विद्यार्थ्यांना शिकवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे.

नवीन इंडक्शन नॉलेज सिस्टीम अभ्यासक्रम सक्तीचायासंदर्भात एक महत्त्वाची बाब इंडक्शन कार्यक्रमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. भारतामध्ये कितीही महान वैज्ञानिक प्राध्यापक आणि त्या त्या विषयातील तज्ञ जरी असले, तरी भारतीय ज्ञान प्रणाली, भारतीय ज्ञान संस्था त्याच्यापेक्षा सर्वोत्तम आहे, असे त्यामध्ये म्हटलेले आहे. म्हणून भारतातील उच्च शिक्षण संस्थातील प्रत्येक शिक्षक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक यांना हे प्रशिक्षण बंधनकारक असणार आहे. या विधानालाच प्राध्यापकांनी आक्षेप घेतलेला आहे.

ज्ञानाचा आधार प्राचीन भारतातील परंपराजगाच्या ज्ञानाचा आधार प्राचीन भारतातील परंपरा यामध्ये एक गोष्ट मांडलेली आहे. जगामध्ये जे काही ज्ञान आहे, त्याचा आधार भारतीय परंपरा आहे. भारतीय प्राचीन शिक्षण संस्था ( Professor Opposed To UGC Course ) आहे. भारतीय पुरातन संस्थाकडूनच जगामध्ये हे ज्ञान दिले गेलेले आहे, हे देखील त्यात नमूद करण्यात आल्याचे प्राध्यापकांनी अधोरेखित केले आहे. या इंडक्शन कार्यक्रमाच्या अभ्यासक्रमामध्ये ही मांडणी कोणत्याही वैज्ञानिक दृष्टिकोनाशी सुसंगत नाही. ही मांडणी चुकीचे असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी प्रशिक्षण घेणे बंधनकारकनागपूर येथील प्राध्यापक युगल रायलू यांनी विद्यापीठ अनुदानाच्या आयोगाच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण ईटीव्ही भारत समोर मांडले. यावेळी त्यांनी केंद्र शासनाने महाविद्यालय आणि विद्यापीठ याशिवाय उच्च शिक्षणाच्या ज्या काही संस्था आहेत, त्यांच्यासाठी नवीन इंडक्शन कार्यक्रम सुरू करत आहे. त्यामध्ये प्रत्येक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक किंवा उच्च शिक्षण संस्थेतील शिक्षक ( UGC New Induction Refresher Course ) यांनी याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या सर्वच उच्च शिक्षण क्षेत्रातल्या प्राध्यापकांनी हे ट्रेनिंग घेतले गेले पाहिजे, हे अत्यंत जरुरी आहे. आपल्या भारतात कुणीही व्यक्ती आपल्या विषयात तज्ञ असू शकतो. मात्र भारतीय ज्ञान प्रणाली याच्यापेक्षा त्याचे ज्ञान सर्वोच्च असू शकत नाही. हे देखील त्यामध्ये शासनाने मांडलेले आहे, जे तर्कसंगत नाही आणि विज्ञान दृष्टिकोनामध्ये तर बसत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

इतिहासाशी फारकत घेणारी गंभीर चूकप्राध्यापक डॉ. मिलिंद वाघ यांनी या अभ्यासक्रमावर हल्ला चढवला. लोहासारख्या धातूचा उगम विक्रमादित्य राजाच्या काळात झाला. मात्र याचा शोध हा वैदिक काळात झाल्याचा उल्लेख आणि दावा या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. ही इतिहासाशी विसंगत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाशी फारकत घेणारी गंभीर चूक असल्याची माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details