मुंबई - विद्यानगरी परिसरात नव्याने तयार होणाऱ्या 'प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर'च्या कोनशिलेचे अनावरण आज राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी, 'तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल' असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे.
प्रा.बाळ आपटे अभ्यास केंद्र आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल - राज्यपाल - सी. विद्यासागर राव
विद्यानगरी परिसरात नव्याने तयार होणाऱ्या 'प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर'च्या कोनशिलेचे अनावरण आज राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी, 'तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल' असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे.
राज्यपाल यावेळी म्हणाले की, या केंद्रातील विद्यार्थ्यांमधून आदीवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणारे सामाजिक नेते तयार होतील. मानवी इतिहासाचा मार्ग बदलणार्या सामाजिक चळवळींसाठी बाळ आपटे सेंटर ‘युवाशक्ती’ म्हणून ओळखले जाईल.
अभ्यास केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, आदी उपस्थित होते.