मुंबई- कोरोनाच्या संकटाच्या काळातही कार्यरत असलेले कर्मचारी संक्रमित होऊ नयेत म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड विभागाने इनहाऊस निर्जंतुकीकरण सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. लोको शेडमध्ये कर्मचाऱ्याने प्रवेश करताच स्प्रेच्या माध्यमातून डोक्यापासून पायापर्यंत त्याच्यावर सॅनिटायझरचा शिडकावा केला जातो आणि त्यानंतरच त्याला आत प्रवेश दिला जात आहे. इनहाऊस सॅनिटायझर टनेलची निर्मिती करण्यास सुमारे 15 हजार रुपये खर्च आला आहे असून टनेल एकावेळी एका व्यक्तीवर फवारणी करतो.
निर्जंतुकीकरण बोगद्याची रचना एमएस पाईपद्वारे टारपॉलिन शीटद्वारे संरक्षित केली आहे. द्रावणाची फवारणी करण्यासाठी पीव्हीसी पाइपिंग आणि स्प्रे नोजल दिले आहेत. बोगद्याचा आकार 150 सेमीx 150 सेमीx 220 सेमी इतका आहे. बोगद्याच्या आत तीन ते पाच सेकंद कालावधीसाठी लोक चालत असताना तीन नोजलचा एक संच फवारला जातो. निर्जंतुकीकरण करण्यासाठी कर्मचार्यांना बोगद्यात प्रवेश करताना त्यांचे हात पुढे करून त्यांच्या समोर उभे करण्याचा सल्ला दिला जातो.