मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या (#MandiraBedi) पतीचं निधन झाले आहे. निर्माता आणि स्टंट डायरेक्टर असलेल्या राज कौशल यांचे ३० जूनला सकाळी निधन झाले.
अभिनेता म्हणून आपल्या करियरची सुरूवात केलेल्या राज कौशल यांचे मन दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीतच जास्त रमले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. राज कौशल यांच्या निधनाची बातमी समजताच, संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिग्दर्शक ओनीर, रोहित रॉय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोशल मिडीयावर त्यांनी राज कौशलसोबतचा फोटो पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.