महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

E Bus Supply Stopped : मुंबईकर गारेगार प्रवासाला मुकणार, ई बस खरेदी प्रक्रिया रखडली - सातशे वातानुकूलित ई बसेस खरेदी

घामाच्या धारांनी ओथंबलेल्या मुंबईकरांना आता गारेगार प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या बेस्टने सातशे वातानुकूलित ई-बसेस खरेदी करण्यासाठी राबविलेल्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांचे गारेगार प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह नाहीत. ही प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

E Bus Supply Stopped
E Bus Supply Stopped

By

Published : May 26, 2023, 7:20 PM IST

Updated : May 26, 2023, 7:39 PM IST

मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या परिवहन सेवेमध्ये 900 वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. यापैकी केवळ सहा बसेस सध्या दाखल झाल्या असून अन्य बसेस दाखल होण्याच्या मार्गावर असल्या तरी एका कंपनीने निविदेतून माघार घेतली आहे. कंपनीने ई बसेसचा पुरवठा करण्यास नकार दिल्याने आता मुंबईकरांच्या गारेगार प्रवासाचे स्वप्न यंदाच्या उन्हाळ्यात तरी पूर्ण होणार नाही अशी चिन्हे आहेत.

ई बस खरेदी प्रक्रिया रखडली



मुंबईकरांना आवडली बस :सध्या मुंबईकरांच्या सेवेत सहा इलेक्ट्रिकल डबल डेकर बसेस रुजू झाल्या आहेत. वातानुकूलित असलेल्या या बसमधून प्रवास करताना प्रवासी आनंद व्यक्त करीत आहेत. मुंबईतील बॅकबे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन स्थानकांत दरम्यान या वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली. सध्या मुंबईत उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटक प्रवाशांची गर्दी झाली असून मुंबईत आलेल्या पर्यटकांमुळे बेस्ट बसच्या रोजच्या महसुलात वाढ झाली आहे. बसचजा रोजचा महसूल 25 लाखांच्या जवळपास पोहोचला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ई बस खरेदी प्रक्रिया रखडली

चार गाड्या सेवेत रुजू :बेस्ट परिवहनने वातावरण कुलीत चार डबल डेकर नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू केल्या आहेत. केवळ सहा रुपयांमध्ये पाच किलोमीटरचा प्रवास बेस्ट उपक्रमाद्वारे प्रवाशांना घडवला जातो. ही सर्वात स्वस्त परिवहन सेवा असल्याने पर्यटकांचा, अन्य प्रवाशांचाही बेस्ट बसेसकडे वाढता कल आहे. त्यामुळे या बसेसना सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अधिकाधिक बसेस मुंबईकरांच्या सेवेत कशा लवकरात लवकर रुजू करता येतील यासाठी बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

  • काय आहे सद्यस्थिती आणि प्रक्रिया?
  • महापालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद देत स्विच मोबिलिटी ऑटोमॅटिक कंपनीने दोनशे बस पुरवण्यास समर्थता दर्शवलीयापैकी स्विच मोबिलिटी ऑटोमॅटिक कंपनीने केवळ सहा बसेस पुरवल्या आहेत.
  • उर्वरित 194 बसेस ऑक्टोबर पर्यंत होणार दाखलकोसिस ई मोबिलिटी या कंपनीकडून 700 बस पुरवठा होणे अपेक्षित.
  • कोशिश ही मोबिलिटी कंपनीने बस पुरवठा करण्यास दिला नकारबेस्ट परिवहन उपक्रमाचे तिसरी निविदा प्रक्रिया ही प्रतिसादाविना
  • काय आहे क्षमता
  • 45 मिनिटांच्या चार्जिंग मध्ये बसेस धावू शकतात 100 किलोमीटर
  • एका इलेक्ट्रिक डबल डेकर बसची 90 प्रवासी क्षमता एका बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये
  • बसची बॉडी अल्युमिनियम पासून बनवण्यात आलेली आहेग्राफिक्स आउट
Last Updated : May 26, 2023, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details