महाराष्ट्र

maharashtra

Priyangi Singh Case : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहीलेल्या मुलीला बरं होण्यास लागतील ३० महिने

By

Published : Nov 19, 2022, 11:26 AM IST

कॉल सेंटरमध्ये काम करणारी प्रियांगी सिंग (२४) जी गेल्या शनिवारी तिच्या घरातून निघून ( Priyangi Singh Case ) गेली. एका दिवसानंतर ती गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. तिचा प्रियकर असलेल्या अमेय दरेकर (२५) याला अटक करण्यात ( Priyangi Boyfriend Arrested) आली.

Priyangi Singh
प्रियांगी सिंग

मुंबई : वसईतील श्रद्धा वालकरसोबत घडलेला भयंकर प्रकाराने अनेक पालकांना हुरहूर लावून सोडलेली असतानाच दहिसर येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीपीओ कर्मचारी म्हणजेच कॉल सेंटरमध्ये काम करणारी प्रियांगी सिंग (२४) जी गेल्या शनिवारी तिच्या घरातून निघून ( Priyangi Singh Case ) गेली. एका दिवसानंतर ती गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. तिचा प्रियकर असलेल्या अमेय दरेकर (२५) याला अटक करण्यात ( Priyangi Boyfriend Arrested) आली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली ( Deputy Commissioner Of Police Smita Patil ) आहे.

मुलीला बरं होण्यास लागतील ३० महिने

जखमी मुलीची स्थिती स्थिर : सध्या जखमी मुलीची स्थिती स्थिर आहे. मात्र, तिला बरे हण्यसाठी किमान ३० महिने लागतील असे अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले आहे. प्रियंगीच्या मणक्याला अनेक फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत आणि कमरेच्या खाली अर्धांगवायू झाला आहे. आरोपी अमेय दरेकरने पोलिसांना सांगितले की, प्रियंगीने नोकरी गमावल्यामुळे तिच्यासोबत दारू पिण्याचा बेत आखला होता. त्यानुसार प्रियंगीचे वडील मुनीश सिंग (46) यांनी सांगितले, "माझ्या मुलीची नोकरी गेल्याची मला कोणतीही माहिती नव्हती. तिला झालेल्या दुखापत आणि मणक्याला झालेल्या नुकसानातून बरे होण्यासाठी किमान 30 महिने लागतील." ती उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

मणक्याची शस्त्रक्रिया : प्रियांगीवर मंगळवारी सहा तासांहून अधिक मणक्याची शस्त्रक्रिया झाली आणि तिच्यावर 14 स्क्रू इम्प्लांट झाले आणि पुढे तिच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ती अधूनमधून उठते आणि ओरडते म्हणून तिला ICU मध्ये तिच्या हॉस्पिटलच्या बेडवर बांधले गेले आहे. ती सक्षम झाल्यावर पोलिसांचे पथक तिचा जबाब नोंदवण्यासाठी वाट पाहत आहे. तिच्या वडिलांनी रासायनिक विश्लेषण करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (FSL) मध्ये गंभीर जखमी झालेल्या रात्री तिने परिधान केलेला ड्रेस सादर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details