महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेव्हा प्रिया दत्त महिलांसोबत सेल्फी काढण्यात दंग होतात... - mumbai

प्रिया दत्त साकीनाका परिसरातील एलबीएस मार्गावरील कृष्णा नगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. महिलांचे प्रश्न, देशाचे भविष्य यावर त्यांना बोलताना बघून अनेक महिलांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

महिलांसबोत सेल्फी काढताना प्रिया दत्त

By

Published : Apr 13, 2019, 8:38 PM IST

Updated : Apr 13, 2019, 9:53 PM IST

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेते सुनील दत्त यांची कन्या आपल्या परिसरात येऊन आपल्यासोबत बोलतात, हे बघून महिला भारावल्या आहेत. त्यामुळे त्यांना सेल्फी काढण्याचा मोह वापरला नाही. महिलांनी सेल्फी काढण्यासाठी मोबाईल समोर करताच प्रिया दत्तही सेल्फी काढण्यात दंग झालेल्या पाहायला मिळाल्या.

महिलांसबोत सेल्फी काढताना प्रिया दत्त

प्रिया दत्त साकीनाका परिसरातील एलबीएस मार्गावरील कृष्णा नगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. महिलांचे प्रश्न, देशाचे भविष्य यावर त्यांना बोलताना बघून अनेक महिलांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. प्रिया दत्त यांनी या परिसरात दोन सभा घेतल्या. त्या सभेतही मोठ्या प्रमाणात महिलांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मागील पाच वर्षात तुमचे प्रश्न सुटले का? असा सवाल केला. ५ वर्षात तुम्ही ज्यांना पाहिले त्यांची कामेही पाहिली. आता मी पुन्हा तुमच्याकडे आली असून माझ्या काळात केलेल्या कामांची तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही २९ एप्रिलला योग्य निर्णय घ्या आणि देशात खोटे बोलणाऱ्या सरकारला उखडून टाकण्यासाठी परिवर्तन करा, असे आवाहन यावेळी प्रिया दत्त यांनी केले. यावेळी दत्त यांचा अनेक स्थानिक महिला संघटनांनी सत्कार करत आम्ही आता हाताची निशाणी विसरणार नसल्याची ग्वाही दिली.

Last Updated : Apr 13, 2019, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details