महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेत्री प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर; ७ जुलैला पुण्यात पक्षप्रवेश ? - Mumbai latest news

राज्याच्या सर्वांगिण विकासाचा व्यापक दृष्टीकोन फक्त शरद पवार यांच्याकडेच असल्याने आपण या पक्षाकडे आकृष्ट झालो असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले आहे.

Priya Berde
प्रिया बेर्डे

By

Published : Jul 4, 2020, 2:39 PM IST

मुंबई-मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. पक्षाची ध्येयधोरणे पटल्याने आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक दृष्टीकोन फक्त शरद पवार यांच्याकडेच असल्याने आपण या पक्षाकडे आकृष्ट झालो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रिया बेर्डे यांचा कोणतीही निवडणूक नसताना पक्षप्रवेश करत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर कोणती जबाबदारी देते याची उत्सुकता आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान पाहता त्यांचा थेट राज्यपाल नियुक्त विधानपरिषद जागेसाठी विचार होणार याबाबत आत्ताच काही सांगता येणे अवघड आहे. कारण राज्यपालांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येइपर्यंत किमान दोन महिने तरी विधानपरिषदेच्या रिक्त जागा भरणार नसल्याचे सुतोवाच यापूर्वीच केले आहे.

येत्या ७ जुलै रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीशीर माहिती 'ई टीव्ही भारत'ला मिळाली आहे. प्रिया या मुंबईत रहात असल्या तरी पुण्यात त्यांच्या मालकीचे एक हॉटेल आहे. जे काही वर्षांपूर्वीच त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे वारंवार त्या मुंबई-पुणे अशी ये-जा करत असतात. अशात राजकिय आखाड्यात उतरताना त्या मुंबई अथवा पुण्याची निवड करतात याची उत्सुकता कायम आहे.

यापूर्वी देखील अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी राजकिय पक्षांची वाट धरली आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या आधी कायमच अभिनेता अभिनेत्रींचे पक्षप्रवेश होत असतात. यापूर्वी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत प्रवेश करून कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून निवडणुक लढवली होती. अभिनेत्री आसावरी जोशी यांनीही याच दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी पक्षाकडून निवडणूक लढली नाही आणि पक्षाच्या प्रचारात फारसा भागही घेतला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details