मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांचे देशद्रोही, तर संजय राऊत यांचे विधानमंडळ नव्हे चोरमंडळ या दोन्ही प्रकरणात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्कभंग मांडण्यात आला होता. आता सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. शिमगा झाल्यानंतर या हक्कभंगावर निर्णय घेतला जाईल, असे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाविरोधात एक, विरोधी पक्षाविरोधात दोन हक्कभंग दाखल करण्यात आले आहेत.
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी :राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर विधिमंडळाच्या पायऱ्यावर सकाळच्या सत्रात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज चालू झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे राम शिंदे यांनी हक्कभंग मांडला होता. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना देशद्रोही संबोधल्याने हक्कभंग मांडला होता.
पवार, दानवे विरोधात हक्कभंग प्रस्ताव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावावर खुलासा केला. तर, खासदार संजय राऊत यांच्या विधानावर सात दिवसात लेखी स्वरूपात खुलासा मागवणार असल्याचे स्पष्ट केले. हा वाद सुरू असतानाच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी, महाराष्ट्र द्रोहांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकल्याचे सांगितले.