मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीपझ वांद्रे-सीप्झ मेट्रो 3च्या कारशेडच्या जागेचा वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. आरे कॉलनीतून कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्यात आल्यानंतर आता जागेच्या मालकी हक्कावरूनच वाद रंगला आहे. कांजुरमार्ग येथील जमीन आमची असल्याचे म्हणत राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) नोटीस पाठवली आहे. तर आता या पाठोपाठ एका खासगी बिल्डरने ही या जागेवर दावा करत एमएमआरडीएला पत्र पाठवत काम बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मेट्रो 3 प्रकल्पातील कारशेडसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे कॉलनीतील जागेची निवड केली. त्यानुसार यासाठी 33 एकर जागा ताब्यात घेत काम सुरू केले. पण त्याचवेळी दुसरीकडे आरेत कारशेड करण्याचे घोषित होताच आदिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी याला जोरदार विरोध केला. पण या विरोधाला डावलत एमएमआरडीएकडून काम सुरू करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तर, हे प्रकरण पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. अनेकदा न्यायालयाकडून कामाला आणि झाडे कापण्याला स्थगिती देण्यात आली. तर अनेकदा स्थगिती उठवण्यात आली.
न्यायालयीन लढाई सुरू असतानाच पर्यावरणप्रेमी - आदिवासी रस्त्यावरची ही लढाई 'सेव्ह आरे'च्या माध्यमातून लढत होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रथम आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. तर, आता ऑक्टोबरमध्ये मेट्रो 3 कारशेड आरेतून कांजुरमार्गला हलवत असल्याची मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे पर्यावरणप्रेमीनी आनंद व्यक्त केला. तर, आता कारशेडचा वाद संपला, असे म्हटले जात असतानाच लागलीच जागेच्या मालकी हक्कावरून वाद सुरू झाला. ही जागा आपली असल्याचा दावा केंद्राने केला. तर ही जमीन पाणथळ असून या निर्णयामुळे आता 5 हजार कोटीचे आर्थिक नुकसान होणार असल्याचा आरोप होऊ लागला. त्यात आता खासगी बिल्डरनेही आपली मालकी या जागेवर दाखवत नव्या वादाला तोंड फोडले आहेे.
'या' बिल्डरने केला दावा