मुंबई- देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र, मुंबईतील खाजगी दवाखाने मोठ्या संख्येने बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. नर्सिंग होम जरी सुरू असले तरी या ठिकाणी डॉक्टर केवळ फोनवर उपलब्ध असल्याचे पाहायला मिळत आहे.
...म्हणून डॉक्टरांनी केले खासगी दवाखाने बंद; रुग्णांचे होतायेत हाल - कोरोना व्हायरस बातमी
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील स्लम परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना बसत आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, सारख्या परिसरात खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांची मोठी तारांबळ होत आहे. राज्य सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे सांगून सुद्धा डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत.
हेही वाचा-COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील स्लम परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना बसत आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, सारख्या परिसरात खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांची मोठी तारांबळ होत आहे. राज्य सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे सांगून सुद्धा डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. काही ठिकाणी दवाखाने बंद जरी असले तरी एक, दोन नर्सिंग होम सुरू आहेत. मात्र, या नर्सिंग होममध्ये फक्त कर्मचारी उपलब्ध असून येणाऱ्या रुग्णांची समस्या फोन वर डॉक्टरांना सांगून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.