महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : खासगी बस व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ - private bus service

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे खासगी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. टाळेबंदीत काहीअंशी सशर्त दिलासा शासनाकडून देण्यात आला आहे. पण, यामध्ये खासगी बस वाहतूकीसाठी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे खासगी बस मालक व त्यावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 13, 2020, 9:15 AM IST

Updated : Jun 13, 2020, 12:39 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे गेले 2 ते 3 महिन्यांपासून खासगी प्रवासी बस सेवा बंद आहे. सरकारने खासगी बससेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा यावर अवलंबून असलेले हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती मुंबई बस मालक संघटनेचे सदस्य हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या व्यथा मांडताना खासगी बस मालक


वाहतूक सेवा बंद असताना गेले 3 महिने बस चालक, क्लिनर यांना बचतीतून पगार दिला. मात्र, आता उत्पन्न नसल्याने पगार कोठून द्यायचा, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. यापुढे बस चालकांना नाईलाजाने कर्ज घेऊन तेच चालक बांधून ठेवण्यासाठी पगार द्यावा लागणार आहे. बस मालक, चालक व क्लिनर यांच्या प्रत्येक घरात अंदाजे 5 सदस्य असल्यास एका बसमागे 15 माणसे जगतात. टाळेबंदी व संचारबंदीच्या काळात 24 मार्चपासून ते आजतागायत खासगी वाहतूक बंद असल्याने खासगी वाहतूकदारांना जबर फटका बसला आहे. विविध प्रकारच्या खासगी वाहनांवर काढलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता मालकांना लागली आहे.

शासनाने खासगी बसमालकांकडे दुर्लक्ष केले आहे, असे बस मालकांचे म्हणणे आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन व्यवसायाला बळ द्यावे. जेणेकरुन वाहतूकक्षेत्र सुरळीत चालेल, असे हेमंत पाटील म्हणाले. जर खासगी बस सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास सामाजिक अंतर पाळून 52 प्रवासी बसमध्ये 26 प्रवासीच घेऊन जावे लागेल. त्यानंतर गेले दोन महिने बस एकाच जागी उभी असल्याने तिचा देखभाल खर्च वाढणार आहे. तसेच सॅनिटायझेशन व इतर खर्च आला त्यामुळे नाईलाजाने बस भाड्यात वाढ करावी लागणार असल्याचेही पाटील म्हणाले.

सरकारने 6 महिने कर सवलत देऊन गाड्यांसाठीच्या विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मुंबई बस चालक संघटनेचे पदाधिकारी अस्ताद खादीवाला यांनी केली आहे.
गाड्या चालवल्या नाहीत तर त्यांना कर न भरण्याची सवलत असते. टाळेबंदीमध्ये बस बंद असल्यास त्यांनी संबंधित परिवहन विभागाकडे पत्र सादर करावे, त्यानुसार त्यांना कर सवलत मिळेल, असे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले.

हेही वाचा -मध्य रेल्वेच्या ताफ्यात 'अर्जून' रोबोट दाखल, स्क्रीनिंग आणि सुरक्षेसाठी उपयोगी

Last Updated : Jun 13, 2020, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details